शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी | Scholarship Exam 2023 Application Form Start | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी | Scholarship Exam 2023 Application Form Start

शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ अर्ज भरण्यास सुरुवात |  Scholarship Exam 2023 Application Form Start

शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ अर्ज भरण्यास सुरुवात |  Scholarship Exam 2023 Application Form Start

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिध्द केली आली आहे.

त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 16/11/२०२२ ते दि. 15/12/२०२२ या कालावधीत देण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. ३१/१२/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा 

शिष्यवृत्ती सराव परीक्षा What's App ग्रुप

शिष्यवृत्ती सराव परीक्षा What's App ग्रुप जॉईन लिंक

महत्वाच्या दिनांक 

  • ·        परीक्षा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३
  • ·        शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- १६/११/२०२२ ते दि. १५/१२/२०२२
scholarship exam 2023 scholarship exam date 2023 scholarship exam date 2023 class 8 haileybury scholarship exam 2023 dost scholarship exam 2023 brain development scholarship exam 2023 scholarship exam date 2023 class 5 maharashtra scholarship exam 2023 Scholarship Exam 2023
शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी |  Scholarship Exam 2023 Application Form Start

शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.

प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष : :

 

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ¦

१)      पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत.

सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. शाळा ग्रामीण भागातील असावी.

3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :

सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही

3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.

4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.

5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे.

काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दबडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा.

3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

परीक्षेचे माध्यम :

परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER