⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या तुमच्या पीएफची रक्कम

एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या तुमच्या पीएफची रक्कम



फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे,


 नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती जाणून घेऊ शकणार आहात. 

तुम्हाला त्यासाठी ०११-२२९० १४०६ या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. 
मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. 
एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.

⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿⣿


पीएफ अकाऊंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा 

आणि उजव्या बाजूला खालील बाजूस Activate UAN वर क्लिक करा.
तिथे UAN नंबर टाका. 

हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल. 

यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा. 

त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा.

 तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. 

तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येईल. 

मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता. 

तसेच ०११-२२९० १४०६ या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.

www.aapalathakare.blogspot.in


युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अर्थात UAN प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला पुरवते. तो नंबर अॅक्टिव्ह कार्यरत करणे आवश्यक आहे. एकदा का तुम्ही UAN अपडेट आणि तुमच्या पीएफ अकाऊंटला लिंक केलात तर तुमचा पीएफ पाहाणे, ई पासबूक हे सर्व सोयीस्कर होते. आधार कार्डलाही तुमच्या UAN पीएफसोबत लिंक करणे गरजेचे आहे. कोणत्या महिन्यात किती रक्कम तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर जमा झाली याबाबतची माहिती ई पासबुकवर पाहायला मिळू शकते. त्यासाठी EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ई पासबुक कार्यरत करावे लागले. वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला ई पासबुकचा पर्याय दिसेल. तिथे UAN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर ई पासबुक दिसेल.



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम