⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधील दुवा :निसेवा ऍप

छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधील दुवा 



छोट्या सेवा व्यावसायिकांसाठी रोजगार निर्मितीला चालना आणि नागरिकांना विनासायास आवश्यक सेवा -सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे ‘निसेवा ऍप’ विकसित करण्यात आले आहे. या ऍपवरील सुविधा ग्राहक आणि व्यावसायिक या दोघानांही विनामूल्य असून मध्यस्थाशिवाय थेट संपर्क आणि देशातील प्रमुख भाषांमध्ये उपलब्धता; आपल्या भागाच्या पिनकोडनुसार सर्च अशी या ऍपची वैशिष्ट्ये आहेत.


सध्याच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना वायरमन, प्लंबर, मॅकेनिक, फिटर, पेस्ट कंट्रोल, टिफिन सेवा, शिकवणीवर्ग , यासह दैनंदिन आवश्यक असणाऱ्या विविध सेवा पुरविणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना मागणी वाढत आहे. मात्र या सुविधा घराजवळच उपलब्ध होतीलच असे नाही तसेच छोट्या व्यवसायिकांनाही लांब- लांब अंतर जावे लागते. घरात अथवा कार्यालयात अचानक वीज समस्या निर्माण झाली. चारचाकी गाडी आहे ;पण वाहनचालक नाही, मुलांना शिकवणी वर्गाला पाठवायचे मात्र घराजवळच, चांगले जेवण घरपोच हवे आहे. टीव्ही, फ्रिज दुरुस्ती, पेस्ट कंट्रोल यासह अनेक सेवा -सुविधा त्याही आपण राहत असलेल्या परिसरातच केवळ एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे काम निसेवा करणार आहे.

हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून नोंदणी केवळ पाच मिनिटात आपल्या व्यवसायाच्या वर्गवारीनुसार तसेच नागरिकांना कोणत्या सुविधा हव्या त्याची नोंदणी करता येणार आहे
App डाऊनलोड करा (size3.3mb)


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम