एमएचटी-सीईटी 2023 ऑनलाईन अर्ज | MHT-CET 2023 Online Application | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

एमएचटी-सीईटी 2023 ऑनलाईन अर्ज | MHT-CET 2023 Online Application

mht cet 2023 online registration,mht cet online registration date 2023,mht cet 2023 application date,mht cet 2023 form date,mht cet 2023 application form date,mh cet 2023 form date,maharashtra cet 2023 application form date,mht cet 2023 application form last date,mht cet 2023 form release date,mh cet law 2023 form dateएमएचटी-सीईटी 2023 ऑनलाईन अर्ज | MHT-CET 2023 Online Application

एमएचटी-सीईटी 2023 ऑनलाईन अर्ज | MHT-CET 2023 Online Application

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी (MHT-CET 2023 Online Application) एमएचटी-सीईटी 2023 प्रवेश पात्रता परीक्षेसाठी 12 वी विज्ञान उत्तीर्ण अथवा परीक्षेस बसलेल्या अथवा समकक्ष अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झाले आहे.

www.mahacet.org या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज ऑनलाइन सादर करता येतील.

वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज निश्चितीसाठी अंतिम तारीख शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 पर्यंत आहे. यानंतर विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज निश्चितीसाठी 8 एप्रिल 2023 ते 15 एप्रिल 2023  मुदत देण्यात आलेली आहे.

सदरील (MHT-CET 2023 Online Application) परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या सूचना व माहितीपुस्तिका राज्य सामायिक परीक्षा प्रवेश कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

एमएचटी -सीईटी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

  •  1.अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे सखोल वाचन करावे.
  • 2.उमेदवारांनी इयत्ता 10वी/12वी च्या गुणपत्रिका वरील नाव अर्ज भरताना त्याचक्रमाने नमूद करावे.
  • 3. उमेदवाराने जर राखीव प्रवर्ग मधून अर्ज केला असेल तर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तयार ठेवावे.
  • 4. उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहितीची खात्री करावी. काही बदल करायचा असल्यास एडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मात्र परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणताही बदल  उमेदवारास करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  •  5. उमेदवाराने स्वतःचा फोटो, सही व ओळखीचा पुरावा योग्य पद्धतीने अपलोड करावा.

परीक्षेचे स्वरूप

ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट (सीबीटी) स्वरूपाची आहे. अकरावी अभ्यासक्रमास 20 टक्के भारांश (वेटेज) व बारावी अभ्यासक्रमास 80 टक्के भारांश देण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी 180 मिनिटचा वेळ दिलेला आहे. या परीक्षेसाठी निगेटिव्ह गुणदान पद्धत नाही.

परीक्षा शुल्क

सामान्य प्रवर्गासाठी रुपये 800 तर राखीव/ ईडब्ल्यूएस /अपंग उमेदवारांसाठी 600 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.

TAG- mht cet 2023 online registration,mht cet online registration date 2023,mht cet 2023 application date,mht cet 2023 form date,mht cet 2023 application form date,mh cet 2023 form date,maharashtra cet 2023 application form date,mht cet 2023 application form last date,mht cet 2023 form release date,mh cet law 2023 form date 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER