⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

‘TET’ नसलेल्या प्रा. शिक्षकांच्या सेवा समाप्ती आदेशाला स्थगिती..!


टीईटीनसलेल्या प्रा. शिक्षकांच्या सेवा समाप्ती आदेशाला स्थगिती..!
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांनी १३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश दिले होते. या आदेशाला औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या आदेशाविरुद्ध समितीच्या मराठवाडा  विभागाचे अध्यक्ष संतोष पाटील (डोणगांवकर) आणि विभागीय सचिव अर्जून रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कार्यकर्ते रोहित देशमुख आणि इतरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी ८ जानेवारीला झाली.
राज्य शासनाने गेल्या दीड-दोन वर्षात टीईटी परीक्षा घेतलेली नाही. परीक्षेची संधी न देता थेट सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत, हे अन्यायकारक आहे. तसेच १९ जानेवारीरोजी होणारी टीईटी परीक्षा हे शिक्षक देणार आहेत. या बाबी विचारात घ्याव्यात व सेवा समाप्तीला स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. ती मान्य करून स्थगिती देण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. व्ही.डी.सपकाळ यांनी काम पाहिले. या निर्णयाचे मराठवाडा विभाग खासगी प्रा. शिक्षक सेवक समितीच्या राज्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये प.महाराष्ट्रातील शिक्षकांच्या केसेस दाखल करावयाच्या असतील, तर समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.  आंदोलनात्मक लढाई व न्यायालयीन लढाई अशा दोन्ही प्रकारे टीईटी न झालेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी समिती कटिबद्ध आहे, असे प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी म्हटले आहे


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम