⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

‘RTE’ प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर!


  • आरटीईप्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर!
  • RTE Admission 2020

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव आरक्षित 25 टक्के जागांवर राबवण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर पडली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागास अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के आरक्षित जागांवर गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळा नोंदणी प्रक्रियेबाबत शिक्षण विभागास अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळांच्या नोंदणीस सुरुवात होते. मात्र, मागील वर्षापासून प्रवेश प्रक्रियेला उशीर होत आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी शाळा व पालकांना अपेक्षा होती. परंतु, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना नाहीत. गेल्यावर्षी आरटीप्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत लांबल्यामुळे प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहिली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश मिळाला तेथेच प्रवेश निश्चित करून घेतला. त्यामुळे आरटीईअंतर्गत जिल्ह्यात अनेक प्रवेश जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे.
अद्याप सूचना नाहीत
शाळांच्या नोंदणीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे शासनाकडून पत्र व आदेश प्राप्त झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळा नोंदणीनंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. याचे प्रत्यक्ष वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम