⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सरकारी सेवा आता आपल्या मोबाईलवर APP


सरकारी सेवा आता आपल्या मोबाईलवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या ग्लोबल सायबर स्पेस कॉन्फरन्समध्ये गेल्या अनेक दिवसापासून चर्चित असलेले उमंग (युनिफाइड मोबाईल अप्लिकेशन फॉर न्यू एज गर्व्हनन्स) हे सरकारी अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 162 सरकारी कामे करु शकता. यात पॅन कार्ड बनवण्यापासून गॅस सिलिंडर बुक करण्यापर्यंत आधार कार्ड डाऊनलोडिंगपासून युटिलिटी बील पेमेंटपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. म्हणूनच आज आपण उमंग अॅप विषयी जाणून घेणार आहोत.


 एक अॅप, कामे अनेक

 हे अॅप आरोग्य, शिक्षण, गॅस बुकिंग, पेंशनसहीत अनेक सुविधा देते. या माध्यमातून तुम्हाला आधारची माहितीही मिळेल.

भारत, इंडेन आणि एच.पी अशा कोणत्याही कंपनीचा तुमचा घरगुती गॅस असेल तर या अॅप मधून तुम्ही बुक करु शकता. 

 पासपोर्टसंबंधी कोणतेही काम करु इच्छित असाल तर या अॅपने ते सहज पार पडेल. 

 यामाध्यमातून तुम्ही पी.एफ कॉंट्रीब्यूशन आणि यासंदर्भातील माहिती मिळवू शकता.

 जर तुमचे ड्रायविंग लायसन्स डिजिटल लॉकरमध्ये असेल तर या अॅपच्या मदतीने ते डाऊनलोडही करु शकता. 

 पॅन कार्ड संबंधी कोणतेही काम करु इच्छित असाल तर या अॅपने ते सहज शक्य आहे.

अशा प्रकारच्या 150 पेक्षा जास्त आवश्यक सेवांचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.


 उमंग 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध

 उमंग अॅप एक गेटवे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही अनेक सरकारी अॅप्स एक्सेस करु शकता. त्यांच्या सुविधा मिळवू शकता.

 या अॅपमध्ये इंटरनली अनेक अॅप इन्स्टॉल आहेत. तरीही हे अॅप मोबाईलमध्ये जास्त जागा घेत नाही.

 हे अॅप इंग्रजी, मराठी, हिंदी सह 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

 तुम्हाला कुठे मिळणार हे अॅप

 गुगल प्लेस्टोअर, अॅपल अॅप स्टोअर आणि विंडोज स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. तेथून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता.


 अॅंड्राईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप काम करते.

उमंग वेब, आयव्हीआर आणि एसएमएस सारख्या माध्यमातूनही तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता. स्मार्टफोनसह टॅबलेट आणि लॅपटॉपवरही हे अॅप डाऊनलोड करु शकता.

9718397183 वर मिस्ड कॉल देऊनही तुम्हाला अॅप डाऊनलोड करता येईल.

 डाऊनलोड केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरशी याचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.



अधिक माहिती साठी या site ला भेट द्या 

https://web.umang.gov.in


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका
४०००+ सराव प्रश्नांसह एकमेव मराठी मार्गदर्शिका आता उपलब्ध!