Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24 नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

SHARE:

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,वरिष्ठ वेतन

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय उत्तरे,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय, निवडश्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय उत्तरे,निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी,निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी उत्तरे,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण लिंक,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय pdf download,निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय pdf

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकांची नाव नोंदणी
Senior and Selection Category Training Registration

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.

ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कसे सुरू करावे.

दुरुस्ती खालील घटकामध्ये करता येणार.

  • १. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
  • २. प्रशिक्षण गट बदलता येईल.
  • ३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
  • ४. ईमेल आयडी बदलता येईल.

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24 नोंदणी क्रमांक येथे बघा

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे पुढील Update मिळवण्यासाठी खालील ग्रुपला जॉईन करा.

Telegram join

whats app join 

ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४,५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.

यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे -

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.

५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

  • गट क्र.१- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
  • गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
  • गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
  • गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)

७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणीहा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.

९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.

११.आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.

१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल. १३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी.आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील - इंटरनेट बँकिंग/क्रेडीट/डेबिट कार्ड/UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे ने त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये - दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.

१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.

१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई- मेल आयडीवर संपर्क करावा.

२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

२२.शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय/जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.

२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे .

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शानास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे . प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

  • १.       श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४
  • २.      श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४

 वरिष्ठ \ निवड श्रेणीचे शासन निर्णय / GR

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण 2023-24 नोंदणी साठीच्या सूचना  

पात्र शिक्षकांनी https://training.scertmaha.ac.in या लिंकवर क्लिक करून नोंदणी सुरु करावी.

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय उत्तरे,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय, निवडश्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय उत्तरे,निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी,निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी उत्तरे,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण लिंक,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय pdf download,निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,निवड श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,2,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,92,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,102,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,27,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,38,विद्यार्थी कट्टा,326,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,539,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,76,शिक्षक Update,417,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,703,All Update,291,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,77,News,505,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,3,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24 नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24 नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण स्वाध्याय,वरिष्ठ वेतन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjSjwyS-p9SQmRqR_r_GEaSxxbws8hD02GEasJfdAhCZJFAvQGCcO4r0WB1ekos0jbv68hEpgKLH-fKDDaRtIaJBAF3cfCAjXFoQI6GYVick0GPxRsRaC_KHB0HwFvTCS_kNZLeU9CiJuTUSBg4_GrvyZ5_JhH6Rwz5hBHAFiA8SVLzqsCngcDUyNm/s16000/Senior%20and%20Selection%20Category%20Training%20Registration.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjSjwyS-p9SQmRqR_r_GEaSxxbws8hD02GEasJfdAhCZJFAvQGCcO4r0WB1ekos0jbv68hEpgKLH-fKDDaRtIaJBAF3cfCAjXFoQI6GYVick0GPxRsRaC_KHB0HwFvTCS_kNZLeU9CiJuTUSBg4_GrvyZ5_JhH6Rwz5hBHAFiA8SVLzqsCngcDUyNm/s72-c/Senior%20and%20Selection%20Category%20Training%20Registration.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/05/varishth-shreni-nivada-shreni-Training-Registration.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/05/varishth-shreni-nivada-shreni-Training-Registration.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content