इन्स्पायर ॲवॉर्डमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक | Gold medal for Maharashtra in Inspire Award | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

इन्स्पायर ॲवॉर्डमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक | Gold medal for Maharashtra in Inspire Award

 इन्स्पायर ॲवॉर्डमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक | Gold medal for Maharashtra in Inspire Award

                   मा.जिंतेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)  विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या हस्ते इन्स्पायर ॲवॉर्ड मानक स्पर्धेत महाराष्ट्रातील 09 विद्यार्थ्यांचा सन्मान व त्यामध्ये यश ज्ञानेश्वर शिंदे याने सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा खोवला.

इन्स्पायर ॲवॉर्डमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक | Gold medal for Maharashtra in Inspire Award

INSPIRE Awards- MANAK Scheme २०२२-२३ | इन्स्पायर अवॉर्ड्स-मानक योजना 2022-23

          विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या 9 व्या Inspire Award MANAK प्रदर्शनामध्ये संपूर्ण देशातून 6.53 लाख विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण कल्पना मांडल्या होत्या.त्यापैकी 556 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले होते.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 31 विद्यार्थी सहभागी होते. त्यातुन महाराष्ट्रातील 09 विद्यार्थ्यांची टाॅप 60 मध्ये निवड झाली आहे.

          महाराष्ट्र राज्याच्या टिमला मा.रणजित सिंह देओल (भा.प्र.से) सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  महाराष्ट्र ,मा.सुरज मांढरे (भा.प्र.से.), आयुक्त शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे, मा.एम. डी.सिंह (भा.प्र.से) संचालकराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे व डॉ.रत्ना गुजर मॅडम, संचालक - राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. तसेच राष्ट्रीय नवप्रवर्तन संस्था, अहमदाबाद (National Innovation Foundation) मधील समन्वयक श्री.पार्थ पवार सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.महाराष्ट्र टिमचे नेतृत्व श्री.राजू नेब सर, राज्य विज्ञान पर्यवेक्षक, नागपूर,डॉ.भारती बेलन - अधिव्याख्याता DIET - नाशिक, श्री.रमेश कोरे, अधिव्याख्याता -DIET तथा विज्ञान सल्लागार शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर व श्री.प्रसन्न खडसे - कार्यकारिणी सदस्य, राज्य बाल विज्ञान परिषद ठाणे यांनी केले.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER