सुधारित - आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती | Minimum age of child for RTE 25% admission | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

सुधारित - आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती | Minimum age of child for RTE 25% admission

२०२२-२३ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती Minimum age of child for RTE 25% admission

सुधारित - २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चिती

Minimum age of child for RTE 25% admission

सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. 

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे राहील.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा दि ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय दि ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे कमाल वय
प्ले ग्रुप / नर्सरी १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९ ३ वर्ष ४ वर्ष ५ महिने ३० दिवस
ज्युनियर केजी १ जुलै २०१७ - ३१ डिसेंबर २०१८ 4 वर्ष ५ वर्ष ५ महिने ३० दिवस
सिनियर केजी १ जुलै २०१६ - ३१ डिसेंबर २०१७ 5 वर्ष ६ वर्ष ५ महिने ३० दिवस
इयत्ता १ ली १ जुलै २०१५ - ३१ डिसेंबर २०१६ 6 वर्ष ७ वर्ष ५ महिने ३० दिवस

आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश

  • पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे.
  • शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही. आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केलेली आहे.

सर्वसाधारण प्रवेशासाठी शासन निर्णयाप्रमाणे व संचालनालयाचे पत्र जा.क्र./प्राशिसं/आरटीई-५२०/२०२१/४१९० दिनांक २०/१२/२०२१.च्या पत्रान्वये कळविलेल्या किमान वयोमर्यादेबाबतच्या तरतूदी लागू राहतील.

परिपत्रक डाऊनलोड (28 फेब्रुवारी २०२२)

परिपत्रक डाऊनलोड (3 मार्च २०२२)


आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER