आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे  Documents required for RTE 25% online admission process

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे

Documents required for RTE 25% online admission process

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

शैक्षणिक वर्ष कागदपत्रे
गतवर्षी सन २०२१-२२ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, गॅसबुक, आधारकार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक, इतर स्थानिक बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य असतील अथवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. परंतु भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी १ वर्षाचा असावा.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य असतील अथवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यातील भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी १ वर्षांचा असावा.

या शिवाय सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्यातील गॅस बुक हे रद्द करण्यात येत आहे. निवासी पुरावा म्हणून गॅस बुक हे गृहीत धरु नये असे शासन आदेश आहेत.


आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश अर्ज 


तसेच सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश घेण्याकरीता निवासी पुराव्याकरिता बैंक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे असावे.निवासी पुरावा म्हणून इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक गृहीत धरु नये. अशा राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER