⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Font Conversion with TBIL


ऑफिस कामासाठी आपणास बऱ्याचदा ISM फॉन्ट वापरावे लागतात. ISM मधील DVB सिरीजचे फॉन्ट  विंडोज 7 वरती व्यवस्थित render होत नाहीत. आणि तुम्ही जर युनिकोड फॉन्ट अथवा इतर फॉन्ट वापरत असाल तर notepad, word, excel, access या फाईल्स TBIL Data Converter वापरून तुमचे फॉन्ट इतर फॉन्ट मध्ये रुपांतरीत करू शकता.

फायदे : 

तुमचा नेहमीचा कीबोर्ड व फॉन्ट वापरून हे रुपांतरण बऱ्याच फॉन्ट मध्ये करू शकता.

सॉफ्टवेअर :


TBIL Data Converter हे तुमच्या संगणकामध्ये नसेल ते ते येथून डाऊनलोड करून घेऊ शकता. किवा www.bhashaindia.com या site वर जाऊन डाऊनलोड करू शकतात किवा खालील बटनावर क्लिक करा 


1.      TBIL Data Converter च्या मदतीने युनिकोड मधील फॉन्ट इतर कोणत्याही फॉन्ट मध्ये कनव्हर्ट करू शकतो. यासाठी प्रथम शीट युनिकोड (Mangal Font) मध्ये तयार करून घ्या.

2.      खात्री म्हणून सिलेक्ट ऑल करून फॉन्ट Mangal करून घ्या.
3.      TBIL Data Converter चालू करा. तुमची फाईल ज्या प्रकारची असेल तो प्रकार निवडा.

4.      Source Language मधून Marathi निवडा.
5.      Source Format / Font मधून Mangal निवडा. ( येथे तुम्ही ज्या फॉन्टमध्ये टायपिंग केले आहे तो फॉन्ट निवडा.)
6.      खाली दर्शवणाऱ्या त्रिकोणावर क्लिक करा. म्हणजे निवडलेला Mangal फॉन्ट खालच्या यादीत दिसेल.
7.      Target Language मधून Marathi निवडा.
8.      Target Format / Font मधून DVB TTSurekh निवडा. (येथे तुम्हाला ज्या फॉन्ट मध्ये रुपांतर हवे आहे तो फॉन्ट निवडा.)
9.      Next निवडा.
10.  Browse मधून तुमची फाईल लोकेशन निवडा.
11.  Sheet ची संख्या सिलेक्ट करा.
12.  Convert ला क्लिक करा.
13.  TBIL Data Converter असा मेसेज देईल. तुमची फाईल त्याच ठिकाणी फाईलचे नाव व अधिकचे _TBIL_Language_Font ह्या नावाने  नावाने दिसेल. चेक करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम