⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

व्हिडीओचे ‘जिफ’ कसे बनवाल?

व्हिडीओचे जिफकसे बनवाल?

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वात जास्त धुमाकूळ सुरूय तो जिफ’ (gif) फाइल्सचा. अतिशय छोटय़ा आकाराच्या व काही सेकंदांच्या या गमतीशीर क्लिप सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या जिफक्लिप कोणत्याही वेब ब्राऊजर, संगणक तसेच कोणत्याही स्मार्टफोनवर चालवता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचा आकार कमी असल्याने त्या पटकन डाऊनलोड होतात. त्यामुळे अलीकडे जिफ मेकरअ‍ॅप आणि सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. याच पाश्र्वभूमीवर आपल्याजवळील व्हिडीओ फाइल्सच्या जिफफाइल कशा बनवायच्या, याच्या टिप्स आम्ही देत आहोत.
Holi Celebration 2017

व्हिडीओपॅड व्हिडीओ एडिटरहे अ‍ॅप वापरून तुम्ही तुमचे व्हिडीओ आकाराने छोटे करून ते जिफमध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्यासाठी व्हिडीओपॅड व्हिडीओ एडिटरडाऊनलोड करून इन्स्टॉल करा. मग हा प्रोग्रॅम सुरू करून ओपन प्रोजेक्टचा पर्याय निवडा. त्यामध्ये तुम्हाला हवा तो व्हिडीओनिवडा व ओपनहा पर्याय निवडा. त्यानंतर संबंधित क्लिपप्रोग्रॅमच्या तळाशी असलेल्या टाइमलाइन विंडोमध्ये क्लिक अँड ड्रॅगकरा.
टाइमलाइन विंडोवर क्लिपवर तुम्हाला रेड मार्करदिसतील. या मार्करच्या साह्याने तुम्ही संबंधित व्हिडीओवरील तुम्हाला हवा तो भाग मार्ककरून घ्या. यासाठी क्लिपच्या सुरुवातीला असलेला मार्कर तुम्हाला हव्या तेवढय़ा भागाच्या सुरुवातीला आणून ठेवा. त्याचप्रमाणे त्या भागाच्या शेवटीही मार्किंग करा. यानंतर प्लेबटण दाबून तुम्ही निवडलेला भाग व्यवस्थित आहे का, याची खातरजमा करून घ्या. तुम्ही निवडलेल्या क्लिपला स्पेशल इफेक्टही देऊ शकता. याशिवाय प्लेबॅकचा वेग कमी-जास्त करण्याचा पर्यायही तुम्हाला उपलब्ध असतो.
तुम्हाला हवी तशी क्लिपतयार झाल्यानंतर प्रोग्रॅमवरील एक्स्पोर्टबटण दाबून जिफफाइल निवडा. येथे तुम्हाला जिफफाइलचे रेझोल्युशन ठरवता येईल. सोशल मीडियावरील जिफफाइलला १२०० बाय ६२८ इतके रेझोल्युशन योग्य असते. तर ट्विटरसाठी १०२४ बाय ५१२ रेझोल्युशन ठरवता येईल.

तुम्हाला फ्रेम रेटही ठरवता येईल. १५ फ्रेम पर सेकंड’ (एफपीएस) हा जिफ’  फाइलसाठी योग्य पर्याय आहे. हा पर्याय निवडण्यासाठी कॉन्स्टंट फ्रेम रेटहा पर्याय निवडा. त्यानंतर एन्कोडर सेटिंगनिवडून लूपिंगपर्यायावर क्लिक करा. लूपिंगकेल्यामुळे तुमची जिफक्लिप सातत्याने प्लेहोत राहते व त्यात गंमत येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर क्रिएटकरून तुम्ही जिफ फाइल सोशल मीडियावर  शेअर करू शकता.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम