Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणी १ ऑक्टोबरपासून

SHARE:

12th students will get employment oriented education; Registration from 1 October,रोजगाराभिमुख शिक्षण;- राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना श

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणी १ ऑक्टोबरपासून  12th students will get employment oriented education; Registration from 1 October

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणी १ ऑक्टोबरपासून

12th students will get employment oriented education; Registration from 1 October

रोजगाराभिमुख शिक्षण;- राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर, जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या स्कुल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनया विभागाद्वारे युजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कमवा व शिकाया तत्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल.

या संस्थेने अभ्यासक्रमाकरीता 3 हजार 750 उद्योगांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा जॉबरोल निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेही प्रवेश क्षमतेचे बंधन नाही. यामध्ये प्रामुख्याने अॅग्रीकल्चर, ऑटोमोटिव, चाइल्ड केअर, इलेक्टॉनिक्स, लाईफ सायन्स, रिटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अॅन्ड आंत्रेप्युनरशिप, टुरिजम अॅन्ड हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, मीडिया व एंटरटेनमेंट, बँकींग व वित्तीय क्षेत्र यामधील संधींचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, कामाला प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी व्यवसाय शिक्षण आवश्यक असून याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थी हा जागतिक स्तरावर आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा भाग बनू शकतो. केंद्र पुरस्कृत व्यवसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर या योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकूण 646 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 12 व्यवसाय शिक्षण विषय शिकविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये 70 हजार विद्यार्थी व्यवसाय शिक्षण घेत आहेत.

समग्र शिक्षा कार्यालयाने जागतिक बँक पुरस्कृत स्टार्स’ (STARS) प्रकल्पांतर्गत मिलाप’ (Maharashtra Young Leaders Aspirations Development Programme) हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याआधी एचसीएल या नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत इयत्ता बारावी गणित या विषयासह उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कमवा आणि शिकातत्वावर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या संधीचा समावेश आहे.

या नोंदणीसाठी https://registrations.hcltechbee.com हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर या दोन्ही करारांच्या माध्यमातून सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

या सामंजस्य कराराद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरी, जास्तीत जास्त गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केले आहे. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,2,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,102,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,27,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,38,विद्यार्थी कट्टा,331,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,547,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,76,शिक्षक Update,429,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,710,All Update,294,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,507,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,4,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणी १ ऑक्टोबरपासून
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणी १ ऑक्टोबरपासून
12th students will get employment oriented education; Registration from 1 October,रोजगाराभिमुख शिक्षण;- राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना श
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1ZPxlU0lo70Sd1Uhfscdtb4gTnKiJ7E3WiBnqWTwcMRe-t_JgbEOZH9dJy6xOdRIftYvvrll1K-xkmGdDhwoe2lFFjRqsJa4wRwNOCQmMFuAxAc0h1LTIAo1JtTNRslCWZHNW9AUroS2jIIitc9yJBPYcV0PlHfxGE1SDtcSW-aTRDJba8pFtkzGb/s16000/12th%20students%20.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1ZPxlU0lo70Sd1Uhfscdtb4gTnKiJ7E3WiBnqWTwcMRe-t_JgbEOZH9dJy6xOdRIftYvvrll1K-xkmGdDhwoe2lFFjRqsJa4wRwNOCQmMFuAxAc0h1LTIAo1JtTNRslCWZHNW9AUroS2jIIitc9yJBPYcV0PlHfxGE1SDtcSW-aTRDJba8pFtkzGb/s72-c/12th%20students%20.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2022/09/12th-students-employment-oriented-education.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2022/09/12th-students-employment-oriented-education.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content