पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अध्ययन स्थिती पडताळणी सूचना | आपला ठाकरे

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अध्ययन स्थिती पडताळणी सूचना

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वयोगट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान pdf,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्ट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वयोगट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान pdf,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्ट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अध्ययन स्थिती पडताळणी सूचना Foundational Literacy and Numeracy (FLN) Study Status Verification Notice

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अध्ययन स्थिती पडताळणी सूचना

Foundational Literacy and Numeracy (FLN) Study Status Verification Notice

महत्वाच्या सूचना :

प्रत्येक मुल समजून घेणे व त्याला शिकण्यास मदत पुरविणे या उद्देशाने आपल्या वर्गात प्रवेशित प्रत्येक मुल अध्ययनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी वस्तुनिष्ठपणे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अध्ययन स्थिती पडताळणी पुढील सूचना विचारात घेऊन करावी.

१. विद्यार्थ्याची ही परीक्षा नसून भाषा व गणित विषयातील अध्ययन सद्यस्थिती पडताळणी आहे.

२. प्रत्येक विद्यार्थ्याची वस्तुनिष्ठ नोंद इयत्तानिहाय व विषयनिहाय सोबतच्या प्रपत्रात करावी.

३. पायाभूत साक्षरता मिशन अंतर्गत भाषा व गणित विषयाच्या किमान क्षमता वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ही अध्ययन सद्यस्थिती पडताळणी करण्यात येत आहे.

४. निपुण भारत अभियान अंतर्गत २०२६-२७ पर्यंत ३ - ९ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाने किमान अध्ययन पातळी प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

५. अध्ययन स्थिती पडताळणी करताना बालकांना प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करा. आनंददायी वातावरणात अध्ययन सद्यस्थिती पडताळणी व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

६. दिलेल्या प्रपत्रात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन स्थितीची नोंद तो ज्या टप्प्यावर आहे तेथेच करावी.

७. इयत्ता निहाय प्रपत्र शाळास्तरावर, शाळानिहाय प्रपत्र केंद्रस्तरावर, केंद्रनिहाय प्रपत्र तालुकास्तरावर जतन करून ठेवावे व तालुकास्तर प्रपत्र एक प्रत जिल्हास्तरावर पाठविण्यात यावी.

भाषा विषय अध्ययन सद्यस्थिती पडताळणी:- (इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी)

ध्वनी ओळखणे :- प्राणी, पक्षी, वाहने इ. ध्वनी ऐकविणे व ते ओळखणे. (मोबाईल / संगणक यांच्या मदतीने ) किंवा यासारखे इतर आवाज ऐकविणे व ते ओळखतात याची खात्री करणे.

चित्रवाचन :- भाषा साहित्य पेटी, चित्र शब्द कार्ड, संदर्भ साहित्य किंवा पाठ्यपुस्तकातील कोणतेही चित्र दाखवून त्याचे नाव, कृती, पात्र/चित्रातील वस्तू, घटना या अनुषंगाने प्रश्न विचारून मुलांना बोलते करावे. (विद्यार्थ्यांच्या परिसर व भावविश्वाशी निगडीत चित्रांची निवड करावी.)

अक्षरवाचन :- अक्षर कार्ड वरील अक्षर ओळखणे, फलकावरील अक्षर ओळखणे, सांगितलेल्या अक्षराला गोल करणे, मुळाक्षरांचे वाचन करणे इ. कृती घ्याव्यात. यासारख्या इतरही कृतीतून अक्षर वाचन क्षमतेची पडताळणी करावी. उदा. (यापेक्षा वेगळे अक्षरे घेता येतील.)

शब्दवाचन :- साधे शब्द, कानामात्रा विरहीत शब्द, दोन अक्षरी, तीन अक्षरी, काना, मात्रा, उकार, वेलांटी असणारे शब्द वाचन तसेच सोपे जोडशब्द, जोडाक्षर यांचे वाचन घ्यावे. इयता निहाय काठीण्य पातळी वाढवावी.

कागद नारळ आडवा बाजार आरसा पळ रवी दिवस किरण दुकान शाळा मला तेल देश गाव माणूस बस पैसा आजोबा आबा मामी सूर्य राम नाना बॉल चंद्र फोन डोंगर बाळू खा दीक्षा आहे कॅमेरा होते ज्ञान

वाक्यवाचन :- चार ते आठ सोपे शब्द असणारे छोटे छोटे वाक्य घ्यावेत. वरच्या वर्गासाठी काठीण्य पातळी वाढवावी. उदा. १. नयन उजवा हात दाखव., २. चेतन मान मागे कर., ३. काल राधा शाळेत आली नाही कारण तिला ताप आला होता. ( यासारखे इतर वाक्य घेऊन किंवा भाषा पेटीतील वाक्य साचे घेऊन ते वाचन करण्यास सांगावे.)

अपठीत मजकूरचे आकलनासह वाचन :- गोष्टीची पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके, पाठ्यपुस्तकातील अध्यापन न केलेला मजकूर, भाषा साहित्य पेटीतील वाचनपाठ इ. पैकी उपलब्ध असेल असा मजकूर वाचन करण्यास सांगावे.

लेखन :- प्रामुख्याने जे विद्यार्थी वाचन पातळी पूर्ण करतील त्यांची लेखन सद्यस्थिती पडताळणी करावी.

१. इयत्ता पहिली :- मुळाक्षरांचे श्रुतलेखन घ्यावे. स्वर व व्यंजने क्रमाने किंवा क्रमाशिवाय सांगून लेखन करतात का? याची नोंद घ्यावी. तशी संख्या प्रपत्रात नोंदवावी. (फक्त अक्षर लेखन घ्यावे)

२. इयत्ता दुसरी:- मुळाक्षरे, साधे शब्द सांगून श्रुतलेखन घ्यावे. स्वर व व्यंजने क्रमाने किंवा क्रमाशिवाय सांगून लेखन करतात का? काना, मात्रा, उकार, वेलांटी यासह शब्द लेखन करतात का? याची खात्री करावी. व त्यानुसार विद्यार्थी संख्या लेखन रकान्यात नमूद करावी.

३. इयत्ता तिसरी :- मुळाक्षरे, शब्द व वाक्य सांगून श्रुतलेखन घ्यावे. स्वर व व्यंजने क्रमाने किंवा क्रमाशिवाय सांगून लेखन करतात का? काना, मात्रा, उकार, वेलांटी यासह शब्द लेखन करतात का? छोटे छोटे वाक्य सांगून त्यांचे श्रुतलेखन करतात का? याची खात्री करावी. व त्यानुसार विद्यार्थी संख्या लेखन रकान्यात नमूद करावी.

गणित विषय अध्ययन सद्यस्थिती पडताळणी:- (इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी )

इयत्ता पहिली

१) अंकांची गाणी, २) वस्तू / चित्र व अंक (संख्या चिन्ह) यांची जोडी लावणे.

३) १ ते ५ पर्यंतच्या वस्तू मोजणे, ४) ६ ते १० पर्यंतच्या वस्तू मोजणे.

इयत्ता दुसरी

1) 1 ते 98 पर्यंतच्या अंकी संख्यांचे वाचन / ओळख. (एकक स्थानी 9 असणाऱ्या दोन अंकी संख्या वगळून )

2) 1 ते 98 पर्यंतच्या अंकी संख्यांचे श्रुतलेखन. (एकक स्थानी 9 असणाऱ्या दोन अंकी संख्या वगळून)

3) 19, 29, 39... 99 याप्रमाणे एकक स्थानी 9 असणाऱ्या दोन अंकी संख्यांचे वाचन ओळख व श्रुतलेखन.

4) 20 पर्यंत उत्तर येईल अशा दोन संख्यांची बेरीज (वस्तू/ रेषा/ठिपके मोजून व पुढे मोजून ) 5) एक अंकी दोन संख्यांची वजाबाकी (वस्तू/रेषा / ठिपके काढून ) 6) 99 पर्यंत वस्तू मोजता येणे.

इयत्ता तिसरी

1) 1 ते 99 पर्यंतच्या अंकी संख्यांचे वाचन / ओळख.

2) 1 ते 99 पर्यंतच्या अंकी संख्यांचे श्रुतलेखन.

3) दोन अंकी दोन संख्यांची बेरीज (बिन हातच्याची)

4) दोन अंकी दोन संख्यांची बेरीज (हातच्याची)

5) दोन अंकी दोन संख्यांची वजाबाकी (बिन हातच्याची)

6) दोन अंकी दोन संख्यांची वजाबाकी (हातच्याची)

टीप:- १. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अंतर्गत भाषा व गणित विषयात विद्यार्थ्याची अध्ययन सद्यस्थिती पडताळणी करून शैक्षणिक वर्ष अखेर प्रत्येक विद्यार्थी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अंतर्गत अपेक्षित क्षमता पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी कृती कार्यक्रम, अध्ययन अनुभव, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर, तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापर, उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करून नियोजन करावे.

२. उपरोक्त सूचनामध्ये दिलेली उदाहरणे फक्त नमुन्यादाखल आहेत. यापेक्षा वेगळे उदा., नमुना उतारे निवडण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना आहे.

३. विद्यार्थ्यांच्या अध्ययन सद्यस्थितीच्या नोंदी प्रपत्रात योग्य प्रकारे कराव्यात.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)

विषय - भाषा

अध्ययन स्थिती पडताळणी (इयत्ता चौथी ते आठवी)

भाषा विषयाचे एकूण सात स्तर असून श्रुतलेखन ते प्रारंभिक स्तर या उलटक्रमाने अध्ययन सद्यस्थिती निश्चित करावी.

१) श्रुतलेखन

२) उतारावाचन

३) जोडाक्षरयुक्त शब्द वाचन

४) जोडाक्षरविरहीत शब्द वाचन

५) अक्षरवाचन

६) चित्रवाचन

७) प्रारंभिक स्तर (शिक्षण पूरक कृती, श्रवण कृती व भाषण-संभाषण कृती.)

स्तर - १ श्रुतलेखन

१) या कृतीत ४-६ वाक्याच्या उतारा निवडून त्याचे श्रुतलेखन घ्यावे. यासाठी काही नमुने उतारे दिलेले आहेत,यासारखे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडित उतारे आपण वापरू शकतात.

२) श्रुतलेखन सांगताना पूर्ण वाक्य सांगावे. गरज भासल्यास वाक्य तोडून सांगावे.

३) श्रुतलेखन विद्यार्थ्यांसमोर तपासून चुका लक्षात आणून दयाव्यात.

४) किमान तीन चुका विद्यार्थी स्वतः दुरुस्त करू शकला तर तो श्रुतलेखन स्तरावर आहे असे समजावे. ५) तीन पेक्षा अधिक चुका असल्यास त्या विद्यार्थ्यांचे उतारा वाचन घ्यावे,

श्रुतलेखनासाठी इयत्तानिहाय नमुना उतारे -

इ) इयत्ता चौथी/पाचवी

नमुना उतारा १

कच्चा आंबा म्हणजे कैरी करी हिरवी, काहीशी आंबट असते. कैरीचे लोणचे, पन्ह व गुळांबा करतात. कैरी पिकली की पिवळी होते. पिकलेल्या आंब्याचा रस गोड लागतो.

नमुना उतारा २

बेडूक पाण्यात व जमिनीवर आढळते. ते श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतात. पावसाळ्यात ते सर्वत्र दिसतात. ते उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात. ते संपूर्ण मांसाहारी असतात. त्यास किडे खायला आवडतात.

नमुना उतारा ३

एकदा काय झाले! खूप पाऊस आला. मी आई, बाबा, दादा गावाला निघालो. वाटेत खूप पाऊस लागला. कार सुरू होती. पण काचेतून पलीकडचे दिसतच नव्हते सगळीकडे पाणी च पाणी....पण मला आठवली मस्त शाळेची गाणी.

ई) सहावी/ सातवी / आठवी

 

नमुना उतारा १

माणसाप्रमाणे प्राण्यांनाही डॉक्टर असतात. आजारी प्राण्यांना ते औषध देतात. प्राणी आजारी पडू नये, यासाठी आपण काळजी घ्यावी. त्यांचे लसीकरण करून घ्यावे. त्यांची नियमित स्वच्छता करावी. त्यांना योग्य आहार द्यावा.

नमुना उतारा २

पळस ही उपयोगी वनस्पती आहे. पळसाची फूले लाल असतात. त्यापासून लाल रंग बनवतात. पळसाच्या पानांचे द्रोण करतात. त्यांच्या पत्रावळीही करतात. या पत्रावळी जेवणासाठी वापरतात.

स्तर २ उतारा वाचन

१) चौथी व पाचवी- शब्दसंख्या ३५-४० वाक्य ५-७ ( जोडाक्षरयुक्त)

सहावी ते आठवी शब्दसंख्या ४५-५५. बाक्य- ६-८ (जोडाक्षरयुक्त) अशा पातळीचे उतारे निवडावे. २) या कृतीसाठी श्रुतलेखन स्तरावरील नमुना उतारा वापरावा. उतान्यात पूर्णविराम व स्वल्पविराम असावेत. ३) यासारखे विद्यार्थ्याच्या भावविश्वाशी निगडित इतर उतारे आपण वाचण्यास सांगू शकतात. ४) वाचनात सलगता असायी, वाचतांना विरामचिन्हे समजून चढ-उतार व हावभावयुक्त वाचन अपेक्षित आहे.

५) वाचताना वाचलेल्या मजकुराचा अर्थबोध होणे अपेक्षित आहे. किमान तू काय वाचले? या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याने देणे अपेक्षित आहे.

६) तीन ते पाच शब्द चूक वाचून स्वतः दुरुस्त केल्यास विद्यार्थी उतारा वाचन स्तरावर आहे, असे समजावे.

७) विद्यार्थी पाचपेक्षा अधिक चुका करत असल्यास त्याला दहा जोडाक्षरयुक्त शब्द वाचनास सांगावे.

स्तर- ३ जोडाक्षरयुक्त शब्दवाचन

१) या स्तरावर शब्द सलग वाचणे अपेक्षित आहे. दहापैकी तीन शब्द तोडून वाचले तरी तो जोडाक्षयुक्त शब्द वाचन स्तरावर असे समजावे.

२) खालील प्रत्येक गटातील दोन शब्द वाचनास सांगावे. यांसारखे विद्यार्थ्याच्या भावविश्वाशी निगडित शब्द आपण वाचनास सांगू शकतात.

३) दहा पैकी सात शब्द वाचत असल्यास विद्यार्थी जोडाक्षरयुक्त शब्दवाचन स्तरावर आहे असे समजावे. ४) जोडाक्षरयुक्त शब्द वाचनात विद्यार्थी तीन पेक्षा अधिक चुका करत असल्यास त्याला जोडाक्षर विरहीत शब्दवाचन करण्यास सांगावे,

नमुना जोडाक्षरयुक्त शब्द

१) त्याला, नदया, समस्या, उपन्न, स्वाध्याय, शाब्बास, ऑगस्ट, उन्हाळा, उत्तर, कष्ट. २) आम्ही, स्वामी, मृत्यु, साहित्य, किल्ला, कॉम्प्युटर, म्हैस, फाल्गुन, तुमच्या, पुनरावृत्ती. ३) वर्ग, पर्वत, अर्थ, सर्व, गर्व, पूर्व, कर्जत, संपर्क शयंत, धैर्य. ४) दिनचर्या, सूर्यास्त, निसर्ग, गुणधर्म, आकर्षण, दुर्लक्ष, वर्चस्व, तीर्थरूप मार्गदर्शन, कर्तव्य. ५) प्रत्येक राष्ट्रप्रेम, कुन्हाड, तन्हा, क्रिकेट, भाद्रपद, श्रमनिष्ठा, अप्राप्त, ग्रंथालय, राष्ट्रगीत.

स्तर - ४ जोडाक्षर विरहीत शब्दवाचन

१) या स्तरावर शब्द सलग वाचणे अपेक्षित आहे.

२) खालील प्रत्येक गटातील एक शब्द वाचनास सांगावे, यांसारखे विद्यार्थ्याच्या भावविश्वाशी निगडित शब्द आपण वाचनास सांगू शकतात.

३) दहा पैकी सात शब्द वाचत असल्यास विद्यार्थी जोडाक्षरविरहीत शब्दवाचन स्तरावर आहे असे समजावे.

४) जोडाक्षर विरहीत शब्द वाचनात विद्यार्थी तीन पेक्षा अधिक चुका करत असल्यास त्याला अक्षरवाचन करण्यास सांगावे.

नमुना जोडाक्षर विरहीत शब्द

१) कागद, आडवा. नारळ, आरसा, बाजार. ३) बुधवार, सुतार, हुशार, तुकाराम, दुकान. ५) तेल, देश, बेरीज, लेखणी, नेहमी. ७) कोट, चौक, आजोबा, कोळसा, चौकोन, ९) कॉलेज, ऑफिस, डॉक्टर, चॉकलेट, ऑपरेशन.

२) किरण, दिवस, तिखट, शिकारी, शनिवारी. ४) बाळू, कापूस, माणूस, एकूण, कबुतर. ६) कैरी, पैसा, सैनिक, वैरण, गैरसोय. ८) कैंट, बॅट, मंट, बॉल, कॉटन, १०) अंगठी, कलिंगड, डोंगर, चांदोबा, जयहिंद

स्तर-५ अक्षरवाचन

१) मुळाक्षरापैकी कोणतेही अक्षरे वाचनास सांगावी. २) किमान शिक्षकाने शिकवलेली मुळाक्षरे वाचताच यायला हवी. तरच तो विद्यार्थी अक्षरवाचन स्तरावर आहे असे समजावे. ३) विद्यार्थी शिकवलेली अक्षर वाचन करत नसल्यास त्यास चित्रवाचन/चित्रवर्णन/चित्रगप्पा करण्यास सांगावे.

स्तर - ६ चित्रवाचन

१) ही कृती घेतांना भाषा साहित्य पेटीतील चित्रांचा वापर करावा.

२) या स्तरावर विद्यार्थ्याने चित्रवाचन, चित्रवर्णन व चित्रगप्पा करणे अपेक्षित आहे.

३) चित्रवाचन करता येत नसेल तर शिक्षण पूरक कृती, श्रवण कृती व भाषण- संभाषण कृती घ्याव्यात.

स्तर - ७ प्रारंभिक स्तर (शिक्षण पूरक कृती, श्रवण कृती व भाषणग-संभाषण कृती.)

१) या कृती घेतांना मुलभूत वाचन क्षमता विकास शिक्षक हस्तपुस्तिकेचा वापर करावा. २) या कृती सामूहिक गटात, व वैयक्तिक स्वरूपात घ्याव्यात. या तिन्ही पद्धतीत कृती करणे अपेक्षित आहे. ३) या कृती किमान प्रत्येकी एक वर्गात सर्व विद्यार्थ्यांसाठी दररोज घ्यावी.

अध्ययन स्थिती पडताळणी (इयत्ता चौथी ते आठवी)

इयत्ता चौथी

विषय - गणित

१. गुणाकार - एक अंकी दोन संख्यांचा गुणाकार करणे. ( गुणाकाराचे सर्व निकष पूर्ण होतील असे उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावेत.)

२. वजाबाकी दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करणे. ( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.)

३. बेरीज - दोन अंकी दोन संख्यांची बेरीज करणे. ( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.) ४. संख्याज्ञान दोन अंकी संख्यांचे श्रुतलेखन, वाचन / ओळख (विद्यार्थ्याना विविध संख्या सांगून खात्री करावी.)

५. ० ते ९ अंक ओळख - उपरोक्त कोणत्याही क्षमतेत समाविष्ट न होणाऱ्या विद्यार्थ्यास किमान ते ९ ओळखता येणे आवश्यक.

इयत्ता पाचवी

१. भागाकार - दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देणे. (यावर भागाकराचे सर्व निकष पूर्ण होतील असे उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावेत.)

२. गुणाकार दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे. ( गुणाकाराचे सर्व निकष पूर्ण होतील असे उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावेत.)

३. वजाबाकी दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करणे.( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.)

४. बेरीज - दोन अंकी दोन संख्यांची बेरीज करणे. ( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.

५. संख्याज्ञान दोन अंकी संख्यांचे श्रुतलेखन, वाचन / ओळख (विद्यार्थ्याना विविध संख्या सांगून खात्री करावी.)

६. ० ते ९ अंक ओळख - उपरोक्त कोणत्याही क्षमतेत समाविष्ट न होणाऱ्या विद्यार्थ्यास किमान ते ९ ओळखता येणे आवश्यक.

इयत्ता सहावी ते आठवी

१. भागाकार - तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देणे. ( यावर भागाकराचे सर्व निकष पूर्ण होतील असे उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावेत.)

२. गुणाकार दोन अंकी संख्येला एक / दोन अंकी संख्येने गुणणे. ( गुणाकाराचे सर्व निकष पूर्ण होतील असे उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावेत.)

३. वजाबाकी - तीन अंकी संख्येतून तीन व दोन अंकी संख्या वजा करणे. ( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.)

४. बेरीज - तीन अंकी दोन संख्यांची बेरीज करणे.( बिनहातच्याची व हातच्याची उदाहरणे घ्यावी.) ५. संख्याज्ञान तीन अंकी संख्यांचे श्रुतलेखन, वाचन / ओळख (विद्यार्थ्याना विविध संख्या सांगून खात्री करावी.)

६. ० ते ९ अंक ओळख - उपरोक्त कोणत्याही क्षमतेत समाविष्ट न होणाऱ्या विद्यार्थ्यास किमान ० ते ९ ओळखता येणे आवश्यक.

TAG- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वयोगट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान pdf,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्ट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वयोगट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान pdf,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्ट,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER