⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक | Performance Grading Index

performance grading index,performance grading index 2021,performance grading index list,performance grading index (pgi) 2019-20,performance grading index 2021 pdf,performance grading index in hindi,performance grading index ranking,performance grading index in marathi,performance grading index released by,performance grading index bihar


शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक | Performance Grading Index

Maharashtra ranks first in the country in school education and Satara district ranks first in the state

केंद्र शासनाच्या जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकातमहाराष्ट्राने एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा जिल्ह्याने या निर्देशाकांतअती उत्तम श्रेणीगाठली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सोमवारी शैक्षणिक वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल असून याद्वारे शालेय शिक्षणाच्या प्रगतीचा राज्यांतर्गत तुलनात्मक आलेख मांडण्यात आला आहे.

केंद्राच्या शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) (‘Performance Grading Index’) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2019-20 हे धरून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वर्ष 2018-19 साठी 725 जिल्ह्यांची तर वर्ष 2019-20साठी 733 जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे.

performance grading index 2019-20,performance grading index (pgi) 2019-20,performance grading index (pgi) 2019-20


महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला

देशातील सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधून प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या राज्यांच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (‘Performance Grading Index’) मध्ये महाराष्ट्राने वर्ष २०१८-१९ मधील श्रेणी १वरून वर्ष २०१९-२० मध्ये श्रेणी १+अशी प्रगती केली आहे. या अहवालांतर्गत देशातील राज्यांना प्रगतीच्या आधारे एकूण १००० गुणांकानुसार एकूण १० श्रेणीत  विभागण्‍यात आले आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राने ८०१ ते ८५० गुणांच्या श्रेणी १मध्ये स्थान मिळविलेल्या दोन राज्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  वर्ष २०१९-२० मध्ये राज्याने या अहवालात ८६९ गुण मिळवून श्रेणी १+मध्ये स्थान मिळविले आहे.याच श्रेणीत देशातील एकूण ७ राज्यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी 

जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत सातारा जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत वर्ष 2018-19 मधील शेवटच्या स्थानाहून (प्रचेष्टा-३) वर्ष 2019-20मध्ये थेट अती उत्तम श्रेणीतस्थान मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या–(PGI-D) रचनेत, ‘परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव, शाळेतील  पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रियाअशा ६ श्रेणींमध्ये एकूण 83 निर्देशकांआधारे 600 गुण देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त गुणांची प्रतवारी ९ श्रेणीत केली असून यात ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्याची प्रतवारी दक्षश्रेणीत केली आहे. ८१ ते ९० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना उत्कर्ष’, ७१ ते ८० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना अतीउत्तम’,  ६१ ते ७० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना उत्तम’, ५१ ते ६० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना प्रचेष्टा १’, ४१ ते ५० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना प्रचेष्टा २आणि ३१ ते ४० टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना  ‘प्रचेष्टा३अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link

वर्ष 2019-20 मध्ये राज्यातील २५ जिल्हे ‘उत्तम श्रेणी

वर्ष 2019-20मध्ये अती उत्तम श्रेणीत देशातील २० जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून सातारा या एकमेव जिल्ह्याने ४२३ गुणांसह या श्रेणीत स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. याच वर्षी उत्तम श्रेणीत राज्यातील २५ जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहेया श्रेणीत देशातील ९५ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा १’ तर एका जिल्ह्याचा समावेश प्रचेष्टा २ मध्ये आहे.

वर्ष २०१८-१९मध्ये उत्तम श्रेणीत देशातील ८९ जिल्ह्यांनी  स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून १२ जिल्ह्यांनी  या  श्रेणीत स्थान मिळविले आहे. याच वर्षी प्रचेष्टा १श्रेणीत राज्यातील १५ जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे तर ४ जिल्ह्यांचा समावेश प्रचेष्टा २आणि 5 जिल्ह्यांचा समावेश प्रचेष्टा ३ मध्ये करण्यात आला आहे.

TAG- performance grading index 2019-20,performance grading index (pgi) 2019-20,performance grading index (pgi) 2019-20, performance grading index upsc,performance grading index 2021,performance grading index 2021 pdf,performance grading index 2021 upsc,performance grading index 2021-22,performance grading index 2021 list,performance grading index list,performance grading index 2021 list,performance grading index (pgi) 2019-20,performance grading index 2021 pdf

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम