Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English Activity Sheet ?

SHARE:

The format of the English worksheet, the expected study methods for it, the practice techniques, the precautions to be taken while solving the workshe

इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English worksheets?

इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English worksheets?

English Course Book Std.X

इंग्रजी कृतिपत्रिकेचे स्वरूप, त्यासाठी अपेक्षित अभ्यासपद्धती, सरावाचे तंत्र, कृतिपत्रिका सोडविताना घ्यावयाची दक्षता आणि परीक्षादालनात कृतिपत्रिका पूर्ण सोडविण्याच्या दृष्टीने वेळेचे नियोजन याबाबत नेमकेपणाने मार्गदर्शन करणारी ही माहिती आम्ही देत आहोत.

बालभारतीने तयार केलेल्या सराव कृतिपत्रिका (Activity Sheet) तुम्ही सोडवत असालच. My English Course Book Std. Ten च्या माध्यमातून तुमचे इंग्रजी अध्ययन व आकलन यात वाढ होत असणार, यात अजिबात शंका नाही. इयत्ता १०वी बोर्डाच्या परीक्षेची Activity Sheet उत्तमप्रकारे सोडवता यावी, यासाठी तुमचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करत असतीलच. तुम्हाला Activity Sheet चे स्वरूप समजून घेऊन त्याप्रमाणे तयारी करता यावी. योग्य वेळेत अचूक उत्तरे लिहिता यावीत यासाठी आपण माहिती करून घेणार आहोत.

Activity Sheet मधील पहिला Section हा Language Study हा आहे. यात तुम्हाला खूप सोप्या व्याकरणविषयक व शब्दसंपत्तीवर आधारित कृती विचारल्या जातात. कृतीच्या एकूण २० गुणांपैकी १६ गुण हे तुमच्या मागील इयत्तांवर आधारित आहेत. पण त्यात १०वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील कृतींचा समावेश असणार आहे. १६ गुणांसाठी ८ कृती/उपक्रम विचारले जातात. उर्वरित ४ गुणांसाठी ३ कृती विचारल्या जातात.

Q.1 (A) मधील ८ कृती पुढीलप्रमाणे सोडवाव्यात.

१)रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

Complete the words by using the correct letter.

अर्थपूर्ण तयार होण्यासाठी वेगवेगळी अक्षरे आजमावून पाहावी लागतात. पाच अक्षरी शब्द बनवण्यासाठी एक अक्षर (letter) भरून तो शब्द पूर्ण करावा. एकूण चार शब्दांसाठी २ गुण देण्यात येतात.

२)Copy the words correctly या कृतीत २ वाक्ये जशीच्या तशी लिहायची आहेत. हे करताना spelling, capital / small letter, punctuation mark काळजीपूर्वक लिहावे लागतात.

३. Put the words in alphabetical words. या कृतीत दोन शब्दगट दिले जातात. पहिला शब्दगट वेगवेगळ्या अक्षराने सुरू होणारा उदा. Action, camel, potter, dump तर दुसरा अक्षरगट एकाच अक्षराने सुरू होणारा असतो. उदा. Nose, next, neightbour, never. दुसरा शब्दगट Alphabetical लावताना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण पहिले, दुसरे अक्षर सारखे असेल तर तिसऱ्या अक्षराच्या क्रमाचा पण विचार करावा लागतो.

४.Punctuate the following यामध्ये दोन वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. यासाठी दिलेल्या वाक्यात कोठे विरामचिन्ह देणे आवश्यक आहे, हे वाचन करताना समजले पाहिजे. उदा. Capital letter, quotation mark ('......') comma (.) full stop (.) question mark (?) exclamation mark (!).

इंग्रजी Activity Sheet चे स्वरूप, गुणदान व त्यासाठी लागणारा संभाव्य वेळ पुढीलप्रमाणे आहे. Activity चे स्वरूप व गुणदान सर्वांसाठी समान असेल. पण ती Activity सोडवण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या सरावावर अवलंबून आहे. तो वेळ तुमच्या नियोजनाप्रमाणे बदलू शकता. पण संपूर्ण Activity Sheet ही तीन तासात म्हणजेच १८० मिनिटात सोडवणे बंधनकारक आहे. हे नमुन्यादाखल आहे. या वेळेत गरजेनुसार बदल होऊ शकेल.

इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English worksheets?

सूचना -सदर नियोजन हे 100 गुणांचे आहे पण सध्या परीक्षा ही 80 गुणाची होते, त्यामुळे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

५) Make four words each. दिलेल्या मोठ्या शब्दातून चार शब्द तयार करा. कमीत कमी तीन अक्षरांचे चार अर्थपूर्ण शब्द तयार करा. मनात वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द तयार करून उत्तरपत्रिकेत अचूक शब्द लिहा.

Ex. speculating पासून late, special, sting, cut शब्द तयार होतात.

६) Spot the error and rewrite the correct sentence या कृतीत दोन चुकीची वाक्ये दिली जातात. त्यातील चूक ओळखून ती दुरूस्त करून वाक्य लिहावे लागते. पहिल्या वाक्यात subject नंतर (be, do, have) यापैकी एकाचे साहाय्यकारी क्रियापद चुकीचे दिले जाते तर दुसऱ्या वाक्यात verb form म्हणजे क्रियापदाचे रूप चुकीचे दिले जाते.

या कृतीसाठी am, is, are, was, were, do, does, have, has ही क्रियापदे कोणत्या कर्त्यानंतर वापरतात हे समजणे महत्त्वाचे असते. तसेच verb form साठी काळानुरूप क्रियापद वापरावे लागते.

उदा. 1. My teacher have many interesting stories.

2. He has write the book.

वरील पहिल्या वाक्यात have ऐवजी has व दुसऱ्या वाक्यात write ऐवजी written असले पाहिजे.

7) Write related words. दिलेल्या कृतीप्रमाणे संबंधित शब्द लिहा. हे शब्द लिहिताना दिलेल्या कृतीतील उदाहरणादाखल दिलेला शब्द समजून घेऊन उर्वरित चार शब्द लिहिणे अपेक्षित असते. Noun असेल तर त्याच्याशी संबंधित Adjectives verb असेल तर त्याच्याशी संबंधित adverb असा सहसंबंध जोडला जातो.

इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English worksheets?

८) Complete the word chain of noun/verb adjectives.

Word chain याचा अर्थ अंताक्षरीप्रमाणे शब्दसाखळी तयार करणे. ही साखळी बनवताना दिलेला शब्द कोणत्या प्रकारचा आहे. त्याच प्रकारचे शब्द त्या साखळीत जोडावे लागतात. उदा. Noun असेल तर Noun, Adjectives असेल तर Adjectives यासाठी सूचना काळजीपूर्वक वाचावी लागते.

Board Exams 2022: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल?

Q.1 (B) प्रश्न १ला (B) या विभागात एकूण तीन कृती असून त्यासाठी चार गुण देण्यात आले आहेत. त्या कृती पुढीलप्रमाणे सोडवाव्यात.

1. Make a meaningful sentence by using the given phrase.

दिलेल्या phrase चा स्वत:च्या वाक्यात उपयोग करणे. तुम्ही अभ्यासलेल्या व वाचलेल्या phrase चा उपयोग येथे करता येतो. दिलेली phrase समजून घेऊन (अर्थ समजून घेणे) व वाक्यात उपयोग करणे, word phrase यांच्या अर्थात फरक असतो. यात दोन प्रकारच्या phrase असू शकतात. Prepositional phrase असेल तर ती जशीच्या तशी वापरता येते. पण verbal phrase असेल तर कर्ता, काळ याप्रमाणे योग्य बदल करावे लागतात, तुमचे वाक्य अचूक असणे महत्त्वाचे आहे.

Add a prefix or suffix to make new words and pick up the root word and use it in your own sentence. ही सूचना समजून घ्या. दिलेल्या दोन शब्दांना prefix / suffix लावून नवीन शब्द लिहा. व त्यापैकी एका मूळ शब्दाचा तुमच्या मनाने वाक्यात उपयोग करा.

३. Add a another clause to expand the sentence दिलेल्या वाक्याला योग्य तो subordinate clause (गौण वाक्य) जोडून वाक्य मोठे करा. यात दिलेले वाक्य वाचून, समजून घेऊन त्यासाठी योग्य त्या subordinate clause चा वापर करावा. clause साठी वाक्यात subject आणि verb असणे महत्त्वाचे असते.

उदा. He did not forget. या वाक्यात पुढीलप्रमाणे clauses जोडता येतील.

He did not forget what he heard.

He did not forget what he experienced.

He did not forget what he learnt.

शिक्षण विभागातर्फे इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (२०२१-२२) 

Language study च्या कृती सोडवताना हे लक्षात ठेवा.

  • ·        सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • ·        कृती/उपक्रम समजून घ्या.
  • ·        उत्तराची उजळणी मनात करा.
  • ·        व्याकरण व शब्दसंपत्ती याचा केलेला सराव आठवा.
  • ·        अचूक उत्तर लिहा.
  • ·        एखादया कृतीचे उत्तर संभ्रम/गोंधळ निर्माण करत असेल तर घाईघाईत न सोडवता पुढच्या कृती सोडवा.
  • ·        कृती योग्य वेळेत सोडवा.

 

Q.2 मध्ये textual passage म्हणजेच तुम्ही वर्षभरात अभ्यासलेल्या पाठातील दोन उतारे दिले जातात.

तुमचे इंग्रजी वाचन, लेखन, शब्दसंपत्ती, व्याकरण व स्वमत व स्वअभिव्यक्ती यावर आधारित कृती असतात.

  • A1 - Simple factual activities. यामध्ये  fill in the blank, complete the sentence, complete the web, true or false, agree or disagree यासारख्या कृती असतात. उतारा वाचनापूर्वी या कृती दिल्या जातात. त्या कृती समजून घेऊन उतारा वाचनाची सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या ओझरत्या (skimming) वाचनाने त्या कृती सोडवता येतील.
  • A2- Activity सोडवण्यासाठी सखोल वाचन (scanning) आवश्यक असते.
  • A3- Vocabulary Helt similar meaning, opposite meaning, find adjective यासारख्या शब्दसंपत्तीवर आधारित Activities असतात. त्यासाठी परत उतारा त्या दृष्टीने वाचावा लागतो.
  • A4- Grammar based activity यामध्ये सूचना समजून घ्या. काही कृतीचे पर्याय (उत्तर) दिले जातात. पर्याय असतील तर खूप काळजीपूर्वक वाचन करावे लागते. कारण त्यात सूक्ष्म फरक असतो आणि एकच अचूक पर्याय असतो. काहीवेळा उत्तराची सुरुवात करून दिलेली असते.
  • A5- Personal response म्हणजे स्वमत व स्वअभिव्यक्ती असून तुमचे मत स्वत:च्या शब्दांत अचूकपणे मांडता आले पाहिजे. या सर्व कृतींना समान प्रत्येकी दोन गुण असतात.


Textual passage सोडवताना हे लक्षात ठेवा.

  • ·        सर्व कृती नीट वाचा, समजून घ्या. कृती नाही समजल्या तर परत वाचा.
  • ·        कृतीनुसार वाचनाचे तंत्र वापरा.
  • ·        उत्तराच्या शोधासाठी त्या दृष्टीने वाचन करा.
  • ·        नवीन शब्दांचा अर्थ संदर्भाने लावा.
  • ·        योग्य शब्दात उत्तरे लिहा.
  • ·        प्रश्न लिहू नका. .
  • ·        आकर्षक आकृती काढण्यात वेळ घालवू नका
  • ·        उत्तराची खात्री करा व मगच लेखन करा.

१० वी च्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका PDF | माध्यम -मराठी

Q.3 (A) प्रश्न ३ मधील (A) साठी एक कविता आकलनासाठी दिली जाते.

एकूण तीन Activities साठी पाच गुण असून प्रत्येक Activity ही वेगळ्या स्वरूपाची आहे. कवितेचे आकलन किती प्रमाणात झाले आहे, यावर आधारित Activities असतात. उतारा वाचन व कविता वाचनातला महत्त्वाचा फरक म्हणजे Poetic expression, creativity imagination समजून घ्यावे लागते. A1 - simple factual, A2 complex factual, A3 poetic device अशा कृती असतात. यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा.

  • ·        कविता समजून घ्या.
  • ·        Activities मधून काय विचारले आहे, हे समजून घ्या.
  • ·        पर्याय दिले असल्यास निवडलेल्या पर्यायाची खात्री करा.
  • ·        उत्तरे स्वत:च्या शब्दात लिहा.
  • ·        Copy-Paste टाळा.
  • ·        Rhyming words, Rhyme scheme, figures 1 of speech शोधा.
  • ·        कवितेचे नीट आकलन झाले नाही तर परत वाचा.

 

प्रश्न 3(B) मध्ये दुसरी वेगळी कविता Appreciation साठी दिली जाते. 

एकूण आठ मुद्द्यांच्या आधारे मुद्देनिहाय किंवा परिच्छेद या स्वरूपात कवितेचे रसग्रहण करणे अपेक्षित असते. कवितेबद्दल खूप माहिती लिहिण्यापेक्षा प्रत्येक मुद्देनिहाय लेखन पुरेसे असते. Title, name of the poet, rhyming scheme, central idea, figures of speech, favourite line, features and why do you like / don't like the poem हे करताना खालील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        सर्व मुद्दे विचारात घेऊन उत्तर लिहा.
  • ·        कवीचे नाव नसेल तर unknown, Anonymous असे नोंदवा.
  • ·        कवितेत एकापेक्षा जास्त figures of speech असू शकतात. त्यापैकी एक लिहा. .
  • ·        favourite line लिहिताना जास्त ओळी लिहू शकता. म्हणजेच कमीत कमी 2 lines लिहा.
  • ·        Features मध्ये कवितेची वैशिष्ट्ये, वेगळेपण,नावीन्य या बाबी नोंदवा.
  • ·        Theme / central idea यामध्ये कवितेचा मुख्य आशय/गाभा काय आहे.
  • ·        कविता का आवडते / आवडत नाही याचे कारण लिहा. तुमचे कारण योग्य पद्धतीने नोंदवा.

 

Q.4 (A) व (B) साठी एकच Non-textual passage दिला जातो.

या अपठित उताऱ्याचे वाचन करून प्रश्न २ मधील कृतीप्रमाणे कृती विचारल्या जातात. या कृतीचे स्वरूप तुमच्या परिचयाचे असते. परंतु उतारा नवीन, न वाचलेला असतो. तुमचे Reading Skill तपासण्यासाठी हा उतारा असतो. यासाठी तुम्ही काही उतारे (पुस्तकाबाहेरील) वाचनाचा सराव करा. हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

·        A1 Activity समजून घेऊनच उताऱ्याचे वाचन सुरू करा. -

·        A1 - उत्तर/उत्तरे सापडले की ते लिहा.

·        A2 - प्रश्न वाचा, त्याचे उत्तर शोधण्यासाठी उतारा अधिक सखोल वाचा.

·        नवीन शब्द, वाक्प्रचार, आशय संदर्भाने समजून 1 घ्या.

·        एखादा शब्द नाही कळला तरी तिथेच न थांबता सलग वाचन करा.

·        न कळलेल्या शब्दाशी संबंधित उत्तर असेल तर त्या शब्दाचा संदर्भ समजून घ्या. त्यासाठी मागील व पुढील वाक्यांचा संदर्भ तपासा.

·        A3Activities मधून शब्दाचे अर्थ, विरुद्ध अर्थ, रचना, वाक्यात उपयोग, संबंधित शब्द याचा विचार करून उतारा नेमक्या शब्दांसाठी वाचा. प्रत्येक नवीन Activity सोडवताना तुमचे आकलन वाढत जाईल.

·        उत्तरात संभ्रम असेल तर तो दूर करा. (नेमके वाचन व आकलन) .

·        A4 साठी Language Study - म्हणजे व्याकरणाची कृती समजून घ्या व सोडवा. सूचना काळजीपूर्वक वाचा.

·        A5 साठी काय विचारले आहे, हे समजून घ्या. या Activity चे उत्तर passage मधून न लिहिता मनाने लिहा.

 

(B) याच उताऱ्यावर आधारित Summary Writing हा प्रश्न विचारला जातो.

तुम्ही A1, A2 - Activities सोडवताना महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या बाबी लक्षात आलेल्या असतात. सारांशलेखनात आकलन व स्वत:च्या शब्दात मांडणी याला महत्त्व असते. Summary / Writing करताना पुढील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        उतारा कशाबद्दल आहे, हे समजून घ्या.
  • ·        आशय समजला तरच title देणे सोपे जाते.
  • ·        वेगवेगळी titles सुचली तरी योग्य title ठरवण्यासाठी थोडा वेळ विचार करा.
  • ·        महत्त्वाचे मुद्दे कोणते, उदाहरणे व स्पष्टीकरण कोणते हे समजून घ्या.
  • ·        पुनरावृत्ती, उदाहरणे व स्पष्टीकरण वगळून मुख्य मुद्दे विचारात घ्या.
  • ·        मुख्य मुद्दे विचारात घेऊन स्वत:च्या भाषेत लिहा. सारांश लेखन करताना सोपी, अचूक भाषा वापरा.
  • ·        स्वत:चे मत, शेरा, अभिप्राय न नोंदवता, त्याच माहितीचे सारांशलेखन करा.

 

Q.5 (A) Letter Writing मध्ये व formal informal असे दोन पर्याय दिले जातात. पत्रलेखनासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        संपूर्ण पत्र डाव्या बाजूने लिहा.
  • ·        स्वत:चे नाव याऐवजी पत्रात दिलेले काल्पनिक नाव (xyz) लिहा.
  • ·        Formal letter मध्ये subject लिहा. Informal मध्ये नाही.
  • ·        Sender's address दोन्ही पत्रात लिहा.
  • ·        Recepient's address फक्त formal letter मध्ये लिहा.
  • ·        पत्र कोणाला लिहित आहात त्याप्रमाणे (salutation) अभिवादन लिहा.
  • ·        सुरुवात, मुख्य भाग व शेवट योग्य पद्धतीने करा.
  • ·        पत्राचा विषय/आशय समजून पत्र लिहा
  • ·        लेखन व्याकरणदृष्ट्या अचूक करा.

 

(B) Dialogue Writing / Drafting a speech

वरील दोनपैकी कोणती कृती तुम्हाला सोडवणे सोपी जाते, यावर आधारित कृतीची निवड करा. तुमचा अधिक सराव कोणत्या कृतीचा आहे ? तुम्हाला कोणती कृती सोडवल्यास अधिक गुण मिळू शकतात याचा विचार करून कृती सोडवा. यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या.

·        Dialogue Writing साठी a, b, c अशा तीन कृतीचे वाचन करा.

  • ·        सूचनेप्रमाणे कृती सोडवा.
  • (a) मध्ये दिलेल्या चार वाक्यांचा योग्य क्रम लिहा.
  • (b) मध्ये उर्वरित संवाद पूर्ण करा.
  • (c) मध्ये दिलेल्या प्रसंगावर कमीत कमी तीन अर्थपूर्ण संवाद तयार करा. म्हणजेच दोन व्यक्तीचे तीन तीन संवाद अपेक्षित असतात.
  • ·        संवादाची भाषा, शिष्टाचार याचा विचार करून संवाद लिहा.
  • ·        Drafting Speech साठी दिलेला विषय समजून घ्या.
  • ·        भाषणाची सुरुवात, मुख्य विषयाची मांडणी, प्रवाही भाषा व समर्पक शेवट करा.
  • ·        समोरच्या व्यक्तीला उद्देशून/श्रोत्यांना उद्देशून बोलत आहात अशी भाषा वापरा.
  • ·        सहज, सोप्या, छोट्या वाक्यांचा वापर करा.
  • ·        Quotations, slogans, idioms, proverb यांचा योग्य ठिकाणी वापर करा.
  • ·        भाषणाचा कच्चा आराखडा मनातल्या मनात तयार करा.
  • ·        भाषा, सहज प्रवाही वापरा.

 

Q.6 (A) मध्ये साठी दोन Information transfer दिल्या जातात.

दोन्ही Activity चे वाचन करून तुम्हाला नेमकी कोणती Activity सोडवायची आहे, हे ठरवा. Activity चे वाचन केल्याशिवाय/ आकलन झाल्याशिवाय Activity सोडवू नका. वाचन झाल्यानंतर पुढील बाबी लक्षात ठेवा. Verbal to Nonverbal - यात माहिती सविस्तर दिली जाते. त्याचे रूपांतर वेगवेगळ्या आराखड्यात graphic मध्ये करावे लागते.

  • ·        आशय/विषय समजून घ्या.
  • ·        माहितीचे विश्लेषण करा. टप्पे करा.
  • ·        माहितीचा flow समजून घ्या.
  • ·        माहिती कोणत्या format मध्ये तंतोतंत बसते हे तपासा.
  • ·        माहितीचा format म्हणजेच आराखडा दिला असेल तर त्या आराखड्यात माहिती तंतोतंत भरा.
  • ·        माहिती वगळू नका किंवा त्यात स्वत:ची भर घालू नका.
  • ·        संपूर्ण महत्त्वाची माहिती transfer झाली का हे तपासा.
  • ·        यात महत्त्वाच्या शब्दांचा वापर करा. Keywords वापरा.
  • ·        Non-verbal to verbal करताना माहिती योग्य वाक्यात लिहा.
  • ·        माहितीची logical order कायम ठेवा.
  • ·        माहितीचे स्पष्टीकरण करताना दिलेल्या उदाहरणांचाच वापर करा.
  • ·        माहिती परिचयाची असो की नसो त्यात बदल करू नका.
  • ·        यात माहितीचे वाक्यांमध्ये रूपांतर करताना grammatical structure बरोबर वापरा.

 

(B) Expansion of ideas मध्ये दिलेले पर्याय वाचा व योग्य पर्याय निवडा.

Proverb, news report, developing story 311 description of place, person, situation या पैकी दोन पर्याय विचारले जातात. हा प्रश्न सोडवताना पुढील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        दिलेल्या proverb चे स्वत:च्या भाषेत स्पष्टीकरण करा.
  • ·        वेगवेगळी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करा. शीर्षक दया.
  • ·        Quotation चा योग्य ठिकाणी वापर करा.
  • ·        News Report असेल तर dateline, lead line, main body, source चा उल्लेख करा.
  • ·        Description साठी adjective noun यांच्या phrases वापरा.

 

Q.7 (A) Live English Activity सोडवताना

Wrapper, Leaflet, form-filling, Advertisement, Review of Book / TV show यापैकी एका कृतीचा समावेश असेल. यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        Activity त काय विचारले आहे, ते समजून घ्या.
  • ·        Form filling साठी काल्पनिक व्यक्तीची माहिती वापरा.
  • ·        स्वत:ची खरी माहिती भरू नका.
  • ·        दिलेली Activity व माहितीचे सखोल वाचन करा.
  • ·        योग्य तेवढीच माहिती लिहा.

 

(B) Translation यात a, b, c अशा तीन प्रकारच्या Activites असतात. त्या सोडवताना पुढील बाबी लक्षात ठेवा.

  • ·        शब्दांचे व वाक्याचे भाषांतर तुमच्या माध्यम भाषेत करा
  • ·        देण्यात आलेल्या वाक्यात म्हण, वाक्प्रचार यांचा समावेश असेल तर भाषांतराच्या भाषेतही त्याच अर्थाच्या म्हणी व वाक्प्रचारांचा समावेश असावा.
  • ·        शब्दश: भाषांतर टाळा,
  • ·        आशयानुरूप भाषांतर करा.
  • ·        माध्यमभाषेतून इंग्रजीत भाषांतर करा.

 

Activity Sheet सोडवताना तीन तासात सर्व Activity सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्या Activities साठी अधिक वेळ लागतो आणि चुका होतात अशा Activities चा अधिक सराव करा. तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा. तुमच्या नियोजनपूर्वक सरावावर तुमचे परीक्षेतील यश अवलंबून असते.

सर्वांना शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

टिम आपला ठाकरे

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,2,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,92,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,102,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,27,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,38,विद्यार्थी कट्टा,327,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,540,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,76,शिक्षक Update,420,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,705,All Update,292,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,505,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,3,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English Activity Sheet ?
इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How to solve English Activity Sheet ?
The format of the English worksheet, the expected study methods for it, the practice techniques, the precautions to be taken while solving the workshe
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhCTkzEoSv_f7rjOCVYRPMP7TwShKhb6eVzq20yHBj8e3PXE-qVSAkyl5TX8Rur1-3aOXtG4roNJtVsNePDjDWrPAzsE15YByuyNdkznxAyRKMbzk6hvNreU2yyNQYl69-EPc-75TbmVJawXHz5z2RZTH1fbJlAfMJ7CJ7FPMQKomRloM-rk3X0qdb4=s16000
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhCTkzEoSv_f7rjOCVYRPMP7TwShKhb6eVzq20yHBj8e3PXE-qVSAkyl5TX8Rur1-3aOXtG4roNJtVsNePDjDWrPAzsE15YByuyNdkznxAyRKMbzk6hvNreU2yyNQYl69-EPc-75TbmVJawXHz5z2RZTH1fbJlAfMJ7CJ7FPMQKomRloM-rk3X0qdb4=s72-c
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2022/03/how-to-solve-english-activity-sheet.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2022/03/how-to-solve-english-activity-sheet.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content