⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणार, होमवर्क, असाईनमेंट, प्रॅक्टीक्लसही पुन्हा सुरू होणार

शाळा भरणार गुगलवर | Google will fill the school  Teachers will take regular classes of students, homework, assignments, Practical’s will also resume

शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणार, होमवर्क, असाईनमेंट, प्रॅक्टीक्लसही पुन्हा सुरू होणार

शाळा भरणार गुगलवर | Google will fill the school

Teachers will take regular classes of students, homework, assignments, Practical’s will also resume

राज्यातील शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरु केल्या आहेत. ऑनलाइन शाळेसाठी आता शिक्षण विभागाला गुगलच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, गुगलच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणार असून गृहपाठ, असाईनमेंट, प्रॅक्टीक्लसही पुन्हा सुरू होणार आहेत. गुगल शाळेसाठी आतापर्यत राज्यातील 1 लाख 34 हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यत गुगलवरील शाळेची हजेरी सुरू होणार आहे. सर्व माध्यमाच्या शाळांसाठी हा पर्याय विनामूल्य खुला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची गुरूवारी (ता. 6) घोषणा करण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. ऑगस्ट अखेरपर्यत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन या उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. गुगलवरील जी स्वीट फाॅर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गुगल मीटद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांची शाळा घेणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही शाळा या जागतिक पर्यायांचा वापर विद्यार्थ्यांसाठी करू शकणार आहेत.

या क्लासरूमसाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापनाकडून लाँगीन आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. तसेच लवकरच शाळांनुसार शिक्षकांना G-suite आयडी व पासवर्डही दिले जाणार आहेत.

 गुगलवरील शाळेची वैशिष्ट्ये | School features on Google

  • - तुकडीप्रमाणे वर्ग भरणार. उदा. 9-, 5-, 7-क.
  • - विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत समजणार.
  • - विद्यार्थ्यांची उपस्थिती, किती शाळांनी वापर केला, किती शाळांनी केला नाही याचे ट्रॅकिंगही.
  • - विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना तपासताही येणार.
  • - असायनमेंट, नोट्स, शिक्षकांच्या टीप्स याचे रेकाॅर्ड कायम राहणार

शाळांसाठी असे असेल लाॅगीन | The login for the school will be -

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम