राज्यातील 20 टक्के व 40 टक्के अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांनी तात्काळ बिंदुनामावली व अनुदान
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 20 टक्के व 40 टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरीत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यात बिंदुनामावली अध्यायात नसल्यामुळे अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे वित्त विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे राज्यातील अनुदानित अनुदानास पात्र घोषित व अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांची बिंदुनामावली तपासण्यासाठी धडक मोहीम कार्यक्रम राबविण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
अनुदानित पात्र असणाऱ्या शाळांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये धडक मोहीम राबवून संबंधित शाळांची बिंदुनामावली तयार करावी, असे निर्देश राज्याच्या सर्व शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य
Telegram - https://t.me/aapalathakare
Facebook Page- fb.me/thakareblog
Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
Best