शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदान कसे करावे?
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदान कसे करावे?
How to Vote in Teacher Constituency Election?
मतदान कसे करावे?
- मतदान करण्यासाठी मतपत्रिकेसोबत दिलेल्या जांभळ्या स्केच पेनचाच वापर करावा.
- आपणास दिलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य
साधनाने जसे इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल
पॉईंट पेन किंवा अन्य साहित्य याद्वारे पसंतीक्रम नोंदविल्यास मतपत्रिका बाद होईल.
- मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या
उमेदवाराच्या नावासमोर 1 हा अंक लिहून मतदान करावे. 1 हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासामोर लिहावा. या पुढील पसंतीक्रम जसे
2, 3, 4... नोंदविणे ऐच्छिक आहे.
- मतपत्रिकेवर नमुद करावयाचा पसंतीक्रम फक्त अंकांमध्येच
(मराठी,
देवनागरी, इंग्रजी रोमन किंवा राज्य घटनेतील
आठव्या परिशिष्टामध्ये नमुद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमुद करावयाचा आहे.
- सदर पसंतीक्रम शब्दात (एक, दोन...) लिहू नये.
- पसंतीच्या उमेदवारापुढे “❌", " ✔" असे
करू नये.
- मतपत्रिकेवर नाव / एखादा शब्द किंवा कुठेही सही/ अंगठा करू नये.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतपत्रिका बाद केव्हा ठरेल?
- पसंतीक्रम 1 लिहीला नसेल.
- 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारास दिला असल्यास.
- पसंतीक्रम 1 नक्की कोणत्याही उमेदवाराला आहे?
याचा बोध होत नसल्यास.
- पसंतीक्रम 1 लिहिल्यानंतर त्याच उमेदवारासमोर 2,
3, 4, 5 असे पसंतीक्रम लिहिल्यास.
- पसंतीक्रम शब्दात (एक, दोन... ) असा नोंदविला
असल्यास. पसंतीक्रमाबरोबर इतर कुठल्याही प्रकारची खुण असेल (सही करणे, नाव लिहिणे, अंगठा देणे इ.) ज्यामुळे मतदाराची ओळख
पटेल.
- मतदान केंद्रावर पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या शाई व्यतिरिक्त इतर शाईने पसंतीक्रम लिहिल्यास.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url