⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षकांना वर्गावर मोबाईलबंदी...धडक मोहीम.

वर्गावर असताना शिक्षक मोबाईलवर व्यस्त राहात असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासन निर्णयानुसार जि.प., खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्वच शाळांत वर्गावर असताना शिक्षकांना मोबाईलबंदी केली आहे.
२३ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी संदीपकुमार 
सोनटक्के यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सध्या जिल्हाभर गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागासह सीईओ एच.पी.तुम्मोड प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पथक शाळेवर धडकत आहे.
गुरुजी शाळेवर वेळेवर येतात की नाही, यापासून ते त्यांनी अध्ययनस्तर निश्चितीत दिलेली गुणवत्ता फुगवटा तर नाही, याचीही तपासणी केली जात आहे. जेथे फुगवटा आढळला तेथे लागलीच समज देवून सुधारणा न केल्यास कारवाईचा इशाराही देत आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी शिक्षकांचा वर्गावरील मोबाईलही चर्चेचा विषय होता. डिजिटल वर्गात काही वेळा शिक्षकांना मोबाईलची गरज भासते. अशावेळी मुख्याध्यापकांच्या परवानगीने मोबाईल वापरता येणार आहे. मात्र त्यावरून संभाषण साधता येणार नाही. जि.प.च्याच नव्हे, तर सर्वच शाळांना हा निर्णय लागू केल्याने खाजगी शाळांतही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. खाजगी शाळांचे शिक्षक बहुतेकवेळा त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याच्या थाटातच वावरत असतात.
गुणवत्तावाढीच्या उपक्रमासाठी निर्णय
मुख्याध्यापकाच्या परवानगीविना वर्गावर मोबाईल नेल्यास संबंधित शिक्षकांना २८ मे २0१५ च्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्र.३ नुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. शिवाय सेवापुस्तिकेतही लाल शाईने नोंद घेण्याची कारवाई करता येते, असा इशाराही या पत्रात दिला आहे. २00४, २00९ व २0१५ मध्ये मोबाईल वापरावरून शासनाने वारंवार शिक्षण विभागा सूचना दिल्या आहेत. मात्र त्याचे पालन अनेक ठिकाणी होत नाही. आता गुणवत्तावाढीच्या दृष्टिने होत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसू नये म्हणून पुन्हा मोबाईल वापरावर बंदीचा आदेश समोर आला आहे.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Zakir khan teacher
    Zakir khan teacher २५ डिसेंबर, २०१९ रोजी ९:२३ PM

    Best work for student's future

  • Ranjana joshi
    Ranjana joshi २५ डिसेंबर, २०१९ रोजी १०:२७ PM

    What's app Varun meeting, training chya suchana den band kelyavar aapoaap mobile waparane band hoil.

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम