⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अँड्रॉइड युजर्ससाठी mAadhaar App

 mAadhaar App

युआयएडीआयने देशातल्या अँड्रॉइड युजर्ससाठी एमआधार हे अ‍ॅप सादर केले असून गुगल प्ले स्टोअरवर ते उपलब्ध करण्यात आले आहे.
             भारतीय नागरिकांना आता बहुतांश शासकीय सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अर्थात हे कार्ड वा त्याची प्रतिकृती वापरणे हे काहींना असुविधेचे ठरते. या अनुषंगाने एमआधार अ‍ॅपचा वापर करून कुणीही डिजीटल पध्दतीने आधार आपल्या स्मार्टफोनमध्ये वागवू शकणार आहे.
       यात कोणत्याही आधार कार्ड युजरची नाव, पत्ता आदींसह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे कुणाचाही बायमेट्रीक डाटा तसेच अन्य माहिती गोपनीय ठेवण्याचा पर्यायदेखील यात देण्यात आला आहे. यासाठी यात बायोमेट्रीक लॉक/अनलॉक या ऑप्शनपैकी एकाची निवड करावी लागेल. यात क्युआर कोड आणि पासवर्डचे सुरक्षा कवच असणार्‍या ई-केवायसीची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. तर यात टाईम बेस्ड वन टाईम पासवर्ड म्हणजे टिओटिपी ही प्रणालीदेखील कार्यान्वित करणे शक्य असून विद्यमान एसएमएसवर आधारित ओटीपी सेवेला हा एक उत्तम पर्याय असेल. 
               सध्या हे अ‍ॅप प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत असल्याचे युआयएडीआयतर्फे जाहीर करण्यात आले आहे. याची पुर्ण आवृत्ती तसेच आयओएस प्रणालीसाठी हे अ‍ॅप लवकरच सादर करण्यात येणार आहे.


हे App डाऊनलोड करण्या साठी  पुढे  बटणा वर क्लिक करा 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown ९ डिसेंबर, २०१८ रोजी १:०२ PM

    धन्यवाद मला ही साइटचा खुप फायदेशीर ठरते

    • Admin
      Admin ११ डिसेंबर, २०१८ रोजी ९:३८ PM

      धन्यवाद सरजी.................
      अशीच भेट देत रहा ...............

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम