⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

truecaller’वरुन असा हटवा तुमचा मोबाईल नंबर!

truecaller वरुन असा हटवा तुमचा मोबाईल नंबर!


ट्रूकॉलर अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असतं. एखादं अनोळखी मोबाईल नंबर ओळखण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. हे अॅप युजर्सच्या अॅड्रेस बुकना अॅक्सेस करुन सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स तयार करतं. जरी तुम्ही ट्रूकॉलर अॅप कधीही इन्स्टॉल केलं नसेल, मात्र तरीही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ट्रूकॉलरच्या डेटाबेसमध्ये असतो.
जर तुम्हाला या ट्रूकॉलर अॅपच्या डेटाबेसमधून तुमचा नंबर हटवायचा असले, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल असेल, तर तुम्ही ट्रूकॉलरमधून तुमचा नंबर डिलिट करु शकत नाही.
सर्वात आधी ट्रूकॉलर डिअॅक्टिव्ह करा
अँड्रॉईड : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये डाव्या बाजूस पीपुल आयकॉनवर क्लिक करा सेटिंग्ज अबाऊट
आयफोन : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये उजव्या बाजूस असलेल्या गियर आयकॉनवर क्लिक करा अबाऊट ट्रूकॉलर त्यानंतर खाली जा आण ट्रूकॉलर डिअॅक्टिव्ह करा
विंडोज : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये खालच्या बाजूस उजव्या बाजूला तीन डॉट असलेलं एक आयकॉन असेल, त्यावर क्लिक करा > सेटिंग्ज > हेल्प > ट्रूकॉलर अकाऊंट डिअॅक्टिव्ह करा
आता ट्रूकॉलरवरुन तुमचा मोबाईल नंबर हटवा
  • ट्रूकॉलर अनलिस्ट पेजवर जा
  • देशाच्या कोडसह मोबाईल नंबर टाईप करा.
  • अनलिस्ट करण्याचं कारण निवडा.
  • व्हेरिफिकेशन कॅप्चा टाईप करा.
  • त्यानंतर अनलिस्टवर क्लिक करा.
ट्रूकॉलरच्या म्हणण्यानुसार, अनलिस्ट रिक्वेस्ट आल्यानंतर 24 तासांच्या आत मोबाईल नंबर हटवलं जातं. अनेकदा ट्रूकॉलरकडून केवळ एका वर्षासाठी नंबर अॅपमधून नंबर डिलिट केला जातो. त्यामुळे एका वर्षानंतरही तुम्ही ट्रूकॉलर अॅपवर तुमचा नंबर दिसत आहे का, हे एकदा तापासा, ज्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता. कारण ट्रूकॉलर अॅपच्या माध्यमातून नंबरचा गैरवापर केला जातो.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम